अंबरनाथ मधील चिखलोली औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात एम.आय.डी.सी.प्रादेशिक अधिकारी व ग्रामस्थांसोबत बैठकीचे अंबरनाथ एम.आय. डी.सी.ऑफिस मध्ये आयोजन करण्यात आले होते.

 










अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा


अंबरनाथ मधील चिखलोली औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात एम.आय.डी.सी.प्रादेशिक अधिकारी व ग्रामस्थांसोबत बैठकीचे अंबरनाथ एम.आय. डी.सी.ऑफिस मध्ये आयोजन करण्यात आले होते.
या बैठकी दरम्यान चिखलोली औद्योगिक क्षेत्रातील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा पार पडली. यामध्ये चिखलोली मधील शंभर वर्ष जुने जागृत देवस्थान असलेले "आई गावदेवी माता" मंदिर असलेली व मंदिराच्या वापरात असलेली भूखंड क्र.पी. एल.४ व पी.एल.५ हा ६००० चौ.मी. भूखंड मंदिर व्यवस्थापन समितीच्या आई गावदेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे करण्यासंदर्भात चर्चा पार पडली. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव एम.आय.डी.सी. प्रादेशिक कार्यालया मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकारी यांना दिल्या. याआधी विधी मंडळाच्या अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांच्याकडे याबाबत लेखी मागणी केली होती. 
तसेच चिखलोली औद्योगिक क्षेत्रात एम.आय.डी.सी. मार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राध्यान्य मिळण्यासंदर्भात चर्चा पार पडली. यानुसार ज्याठिकाणी काम करण्यात येणार आहे, त्याच जागेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्याठीकाणी काम मिळण्याकरिता प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
त्याचबरोबर या भागातील आदिवासी वस्ती मध्ये एम.आय.डी.सी.ची जुनी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन असून ही सद्या जीर्ण झाली असल्याने येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्याठिकाणी नव्याने पाईप लाईन टाकण्यात यावी तसेच ज्याठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे आहे ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना देखील दिल्या. तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा पार पडली.
या बैठकीला श्री.नारायण धोंडे, श्री.शैलेश भोईर, श्री.भरत तेलंगे, श्री.प्रजेश तेलंगे, श्री.श्रीकांत तेलंगे, श्री. कैलाश भोईर, श्री.प्रतीक तेलंगे, एम.आय. डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी श्री. सुनिल भुताळे, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र कोते, शिवाजीनगर- अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक भगत, अंबरनाथ एम.आय. डी.सी.चे अभियंता श्री. अंभोरे तसेच वरिष्ठ अधिकारी व चिखलोली मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post