वालधुनी नदी किनारील ३००० कुटुंबांचा निवडणूकीवर बहिष्कार.

 









उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

विठ्ठलवाड़ी पुर्व स्मशानभुमी समोरिल रहिवासीत क्षेत्र लगत असलेले वालधूनी उपनदी पात्र बुजवून बांधकाम सुरु आहे त्या संदर्भात निवडणूक आयोग अधिकारी श्री गोपीनाथ ठोंबरे यांना ३००० कुटुंबांचा येणाऱ्या सर्व निवडणूकीवर बहिष्कार करणार असे पत्र दिले गेले,

विठ्ठलवाड़ी स्मशानभुमी समोरिल रहिवासीत क्षेत्र लगत असलेले वालधूनी उपनदी पात्र बुजवून बांधकाम सुरु आहे. ज्यामुळे पावसाळ्यात निश्चित पुरपरिस्थिती निर्माण होऊन, घरादाराचे नुकसान आणि, इथल्या रहिवासीयांची वाताहत होणार आहे. वारंवार तक्रार करून महापालिका कोणतीच कारवाई करीत नाही. जो पर्यंत लोकप्रतिनिधी आणि महापालिका व सरकार काम थांबवून नदी पात्राचे संवर्धन करीत नाही तो पर्यंत येणाऱ्या कोणत्याच निवडणुकीत आम्ही मताधिकार वापरणार नाही,  निवडणुकीवर बहिष्कार असेल यांची नोंद, निवडणूक आयोगाने व सरकारने घ्यावी  अशी भुमिका साईनगर रहिवासी संघ

आणि वालधूनी नदी व रहिवासी बचाव संघर्ष समिती द्वारे निवेदन देण्यात आले,आंदोलना ची दखल तात्काळ निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आली व कल्याण डोम्बिवली महानगर पालिकेचे सम्बंधित अधिकारी व आंदोलनकर्ते संघटनेचे प्रमुख उदय रसाळ व श्रीमती सुरेखा जगताप यांचे सोबत ,२३ एप्रिल रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय डोम्बिवली येथे आयोजित करण्यात आली आहे.








Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post