उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
सालाबादप्रमाणे गुढीपाडवा निमित्ताने निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येऊन यानिमित्ताने सर्वांना सरबत वाटप करण्यात आले.नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन थंडगार सरबतचा आस्वाद घेतला.
क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज कोरडे, उपाध्यक्ष संदीप सायखेडे,,उपसचिव सचिन पवार,सल्लागार अशोक जगताप, मधुकर कोकाटे, रविंद्र बोरनारे यांच्या सह सदस्य संदीप रावताळे आणि अखिल भारतीय जिवा सेनेचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष मंगेश सायखेडे व जेष्ठ समाजबांधव फुलपगारे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
Best Wishes
Breaking News
celebrating
Celebration day
festival
politics
Social
Ulhasnagar
Ulhasnagar Breaking News




