दैनिक नवभारत/नवराष्ट्र समूहाचा वतीने उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांना आदर्श समाजसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.

 









उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


नवराष्ट्र सन्मान सोहळा ठाणे,  20 मे 2023 रोजी कल्याणच्या अत्रे नाट्यगृहात संपन्न झाला, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यात सन्मान करण्यात आला. यात उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांना आदर्श समाजसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक संघटना व पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, प्रभागात विकासकामे राबविले, कोव्हिडं महामारीच्या काळात जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचविले, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधोपचारासाठी मदत मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम, विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व गुणगौरव करून प्रोत्साहन, महिलांसाठी विविध उपक्रम व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे तसेच बहुचर्चित टायगर ला जीवनदान देऊन विदेशी जाईपर्यंत यशस्वी पाठपुरावा या विविध कामांची दखल घेत शिवाजी रगडे यांना सन्मानित करण्यात आले या बद्दल शिवाजी रगडे यांचे हार्दिक अभिनंदन व असेच भरवी समाजकार्य आपल्या हातुन होत राहो या सदिच्छा.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post