उल्हासनगर येथे शिवचंद्र नागरी सहकारी पतसंस्था यांच्या कार्यालयांचे उद्घाटन सम्पन्न.

 































उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर येथे शिवचंद्र नागरी सहकारी पतसंस्था यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. श्री. गोपाळजी लांडगे साहेब यांनी लाल फित कापून या कार्यालयाचे उद्घाटन केले. ही शिवचंद्र नागरी सहकारी पाट संस्था उल्हासनगरचे सुप्रसिद्ध उद्योगपती युवासेनेचे शहरप्रमुख सुशील पवार यांची आहे.याप्रसंगी उपस्थित राहून पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्यास आमदार डॉक्टर बालाजी किनिकर, उल्हासनगरच्या माजी महापौर सौ. लीलाताई आशान, उल्हासनगर शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, युवासेनाचे सुरजीत पंजाबी,माजी नगरसेवक ज्योत्सना सुरेश जाधव, सुरेश जाधव, माजी नगरसेविका ज्योतिताई माने इतर स्थानिक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post