म्हारळगावात ठाकरे गटाच्या वतीने महाआरोग्य शिबीर व हळदीकुंकू चा कार्यक्रम साजरा.




 

कल्याण ग्रामीण (म्हारळगाव): नीतू विश्वकर्मा 


           उल्हासनगर विधानसभेत असलेल्या म्हारळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाआरोग्य शिबिर व आरोग्य विषयी मार्गदर्शन तसेच हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी म्हारळगावातील शेकडो नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हळद कुंकू चा कार्यक्रम आयोजन करण्यात आला.या वेळी उल्हासनगर मधील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. तसेच   कार्यक्रमात हजारो महिलानची उपस्थित होती व त्यांना प्लॅस्टिक मुक्त पर्यावरणाचे संदेश देत कापडी पिशव्या व वान वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी बोडारे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विजयाताई पोटे, नगरसेविका ज्योतीताई गायकवाड,जिल्हा समन्वय धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहर प्रमुख दिलीप गायकवाड, म्हारळच्या सरपंच नीलिमाताई म्हात्रे,रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रमुख पिंकी भाई बुल्लर, म्हारळ शहर प्रमुख प्रकाशजी चौधरी, महिला आघाडी प्रमुख भावनाताई भारंबे, युवासेना शहर अधिकारी. निकेत व्यवहारे, तसेच सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post