बौद्ध धम्म दिप सेवा संघाच्यावतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून चर्चासत्र...!

म्हारळ : नीतू विश्वकर्मा

म्हारळ गावातील बौद्ध धम्म दिप सेवा संघ मागील काही वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना एक मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून कामगार स्वाभिमान दिन या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मागील २५ वर्षांपासून म्हारळगाव स्वच्छ व सुंदर व निरोगी राहावे या भावनेतून म्हारळ ग्रामपंचायतीचे सफाई कामगारांचे मुकादम चंद्रकांत जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव  करण्यात आला आणि बौद्ध धम्म दिप सेवा संघा बरोबर मागील 23 वर्षांपासून समाज उपयोगी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य देत असलेले ग्रामपंचायत सदस्या मंगलाताई इंगळे यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. व संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार स्वाभिमान दिन या विषयावर चर्चासत्र करत असताना बुद्ध विहारात मागील काही दिवसांपासून प्रगतीपथावर   सुरू असलेले स्थानगृह व शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे देखील लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी संघाचे अध्यक्ष मोहनदास गडलिंग, सचिव भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई इंगळे, प्रमुख वक्ते जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत जाधव सह परिसरातील ग्रामस्थ व संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post