उल्हासनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनसेतर्फे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गौरव.


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने उल्हासनगर पोलीस ठाण्यातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या, सण-उत्सवांच्या काळातही कुटुंबापासून दूर राहून शिस्त आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या पोलीस दलाचे फेटा, पुष्पगुच्छ आणि लाडू भरवून मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक यांच्या हस्ते नुकतेच सन्मानचिन्ह प्राप्त झालेले उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णू नाथा ताम्हाणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव, मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधी मुन्ना भाई, शाबीर शेख तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलाश वाघ, उप-विभाग अध्यक्ष मुकेश चव्हाण, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, दीपेश धारिवाल, तुकाराम थोरात, मनोज चिंचनकर, नरेश चिकसे, जगदीश माने, रोहित सिंग, संतोष शर्मा, साहिल सय्यद आणि इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेने घेतलेल्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post