वालधुनी नदी संवर्धनसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत लक्षवेधी द्वारे विशेष निधी ची मागणी केली.

 



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर यांनी आज विधानसभा सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना अशा विविध योजना घोषित करून महिलांनसह सर्व घटकांना न्याय दिल्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करुन कल्याण शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या वालधुनी नदीचे संवर्धन करावे, त्यासाठी विशेष निधी द्यावा, नदीतील गाळ काढावा व खोलीकरण करावे तसेच वालधुनी नदी तीरावरील परिसर स्वच्छ करून नदीचे सुशोभीकरण करावे जेणे करून परिसरातील भागात पुराचे पाणी शिरणार नाही, अशी अभ्यासू मागणी केली.

त्यांचे ह्या उपक्रमास वालधुनी नदी संवर्धन समीती शशिकांत दायमा तर्फे हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post