ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.





ठाणे - नीतू विश्वकर्मा 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने जिल्हा नियोजन भवनमधील सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेण्यात आला. 

उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार संजय भोसले, माहिती अधिकारी नंदकुमार ब. वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी रेखा दीदी, ब्रह्माकुमारी सविता बहन यांनी योगा प्रात्यक्षिक व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी ब्रह्माकुमारी मिना दीदी, ब्रह्माकुमारी बिंदिया बहन, व ब्रह्माकुमार नितीन भाई यांनीही संयोजन केले. 

श्री. ठोंबरे यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व असून जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून रोज योगाभ्यास करावा, असे सांगितले.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post