उल्हासनगर मध्ये लवकर चर्मकार समाजाचे समाज भवन निर्माण होणार.

 



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष श्री भरत राजवानी (गंगोत्री) यांचा समवेत डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना कल्याण लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच उल्हासनगर शहरामध्ये चर्मकार समाजचे लोक मोठ्या प्रमाण राहत आसूनही तरी सुद्धा चर्मकार समाजाचे समाज भवन नाही त्या मुळे समाजातील लग्न, वाढदिवस व अनेक प्रकारचे कार्यक्रम हे जास्त पैसे देऊन समाजातील माझे बांधव हॉल भाड्याने घेऊन आज पर्यंत करत आले आहे.

कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना संपूर्ण माझ्या चांभार समाजातर्फे उल्हासनगर शहर मध्ये लवकरात लवकर समाज भवन ची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी केली व खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांनी ही मला आश्वासन दिले की येणाऱ्या काही दिवसात आपले समाज भवन निर्माण होऊन आपल्या समाजासाठी उपलब्ध होईल. या साठी डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार.




Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post