उल्हासनगर महानगर पालिकेची कसलीही परवानगी न घेता आर सी सी पद्धतीची विनापरवाना, बेकायदेशीर,अनधिकृत बांधकामें प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये सर्रासपणे सुरू.

 







उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

प्रभाग समिती क्रमांक २,पॅनल क्रमांक ९ येथील सपना गार्डन जवळील हरी कीर्तन दरबार शेजारी उल्हासनगर महानगर पालिकेची कसलीही परवानगी नसतांना आर सी सी पद्धतीचे  बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहे.

अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका,सुरू असतील तर तात्काळ तोडक कारवाई करा असा मा.मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट आदेश असतांना सुद्धा उल्हासनगर शहरात अश्या प्रकारची अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रभाग मुकादम,प्रभाग अधिकारी यांनी संबंधित बांधकाम मालक, विकासक यांना कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक असतांना तसे काही होतांना दिसत नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे स्पष्ट होते.

मा.आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,उप-आयुक्त आणि संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी तात्काळ अश्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याचे आदेश देतील की या बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाला छुपा पाठिंबा देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post