Mumbai: एक होती मुंबई तिला बोलत असे क्रिकेटचे माहेरघर..?

 







मुंबई : नीतू विश्वकर्मा


आज भारत(Bharat) विरुद्ध पाकिस्तान(Pakistan)असा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम(Narendra Modi Stadium) येथे सुरू आहे.तो सामना अहमदाबादला सुरू आहे यात आम्हाला काहीच दुःख नाही आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सुरू आहे त्याचं तर अजिबातच नाही.दुःख त्या माऊलीचे होत आहे जी माऊली वानखडे स्टेडियम (Wankhede Stadium) बाहेर एका खांद्यावर लहान बाळ घेऊन दुसऱ्या हातात तिरंगा झेंडा विकत होती.तर दुसरी माऊली हातात ट्रॉली घेऊन पिपाणी, फुगे, टोप्या घेऊन विक्री साठी बसली होती.आज क्रिकेट रसिकांसाठी सकाळी स्पेशल वंदे भारत ट्रेन सुद्धा सोडण्यात आली असो.विषय आपल्या मुंबईचा (Mumbai) आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले आज त्याचाच बदला हे घेत नाही ना अशी खदखद मनात वाटते.आज हा सामना आपल्या मुंबई मध्ये रंगला असता. मी स्वतः वानखडे स्टेडियम बाहेर तेथील काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो होतो ज्या ज्या वेळी मुंबई वानखेडे स्टेडियमचा बाहेर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असायचा त्यावेळी  स्टेडियमच्या बाहेरचा परिसरात जत्रेचे स्वरूप पाहिला मिळत होते.सर्व स्टॉल वाले सामना सुरू होण्याच्या आदल्याच 

 रात्री येऊन जागे साठी धडपड करत असे.वडापावची गाडी,स्नॅक्स सेंटर असो की रिक्षा,टेक्सी चालक, हॉटेलस झेंडे विक्रेते छोटे मोठे दुकानदार आदी यांची गजबज आपण पाहिली आहे. एका दिवसा मध्ये लाखो करोडो रुपयाची उलाढाल फक्त एका स्टेडियम बाहेर होत असते.आज स्टेडियम बाहेर फिरताना तिकडे सुताक पडल्या सारखे वाटत होते. खरच खुप दुःख होतंय हे सर्व पाहताना मुंबई मराठी माणसाच्या हातातून निसटून जात असल्याचा भास होतोय असे बोलले तरी काही वावगे ठरणार नाही. 

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा जय शिवराय.

निकेत सखाराम व्यवहारे.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post