वंचित बहुजन महिला आघाडीचा रूक्मिणीबाई रुग्णालयाला दणका.

 







कल्याण : नीतू विश्वकर्मा

जिल्ह्यातील ऐतिहासिक कल्याण शहाराच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात एका मजुर मोलकरीण महिलेला रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ॲडमीट न करून घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्या महिलेला रूग्णालयाच्या गेट बाहेरच बाळाला जन्म द्यावा लागला. ही अतिशय संतापजनक घटना घडली.

त्या महिलेचा आणि तिच्या नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचा ईलाजा अभावी मृत्यू झाला असता तर याची जबाबदारी त्या रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असती का? किंवा प्रशासनाने घेतली असती का? व कल्याण,मुरबाड,शहापूर तालुक्यातून येणाऱ्या गरिब रुग्णाच्या हलगर्जी बाबत जाब विचारण्यासाठी व त्या निंदनीय घटनेचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा मायाताई कांबळे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली रेखाताई कुरवारे, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष संतोष गायकवाड व कार्यकर्यांनी रूग्णालयाच्या अधिकारींना धारेवर धरून जबाबदार अधिकारींना निवेदन देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

रूग्णालयात रुग्णांना यापुढे गैरसोयीमुळे कुठलाच त्रास होता कामा नये, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी ठाणे जिल्ह्याच्यावतीने रूक्मिणीबाई रूग्णालयाच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा मायाताई कांबळे व संतोष गायकवाड कल्याण प अध्यक्ष यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारींना दिला आहे.

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्ह्याचे व कल्याण उल्हासनगर शहराचे पुढीलप्रमाणे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  वैशाली कांबळे, रेखाताई उबाळे, संगीताताई माने मोहाने, ललिता आखाडे, ईशा जाधव,  काजल यादव,युवा कार्यकर्ते ॲड.प्रशांत जाधव, नितिन भालेराव, मुकेश चौथमल, तात्या केदार, प्रकाश घोंगडे, सुमित ठोकळ, शहाशवाज शेख, सुनील शहा, किरण शेंडगे, राजेश पवार, छोटूभाई राजेश ओव्हाळ, अनिल गायकवाड, भैयासाहेब कसबे, शशिकांतभोईर उपस्थित होते.




Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post