शिवसेना भाजप युतीत स्वतःच्या स्वार्थासाठी फूट पाडण्याचे चालू असलेले षडयंत्र वेळेवरच रोखले पाहिजे—शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड

 






कल्याण : नीतू विश्वकर्मा


कल्याण पूर्व १४२ विधानसभा क्षेत्रात स्वयंघोषित भाजपचा मुख्य नेता असल्याचे भासवून, मी जे सांगेल तेच भविष्यात होणार असे भाष्य करून कार्यकर्त्यांचे विचार दूषित करण्याचे काम चालू आहे. शिवसेना + भाजपा युती धर्म आम्ही प्रामाणिकपणे पाळत असताना यांचा भ्रष्टाचार, यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी चुकीचे भाष्य सार्वजनिक ठिकाणी हे करत आहेत. कल्याण पूर्वेच्या नागरिकांना सर्व ज्ञात आहे. कल्याण पूर्वेचा विकास कोणामुळे होत आहे.

याकरिता आमची भाजपच्या वरिष्ठांना विनंती आहे, आपण आपल्या स्वयंघोषित मुख्य नेत्याला समज द्यावी. युती ही अभेद्य आहे. आम्ही जसे आमच्या वरिष्ठांचे आदेश पाळून युती टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत तसे प्रयत्न आपल्या कडून सुद्धा व्हावेत. येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर युती टिकणे कठीण होईल.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post