उल्हासनगर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख यांच्या अध्यक्षे खाली क्रीडा समितीची बैठक पार पडली.

 







उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 


उल्हासनगर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख यांच्या अध्यक्षे खाली आज मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी महापालिका क्रीडा समितीची बैठक पार पाडण्यात आली असुन त्यात २०२३-२४ मध्ये शासनमान्य खेळांचे नियोजन, मॅरेथॉन स्पर्धा घेणे, उल्हासनगर शहरात खेळांबाबतच्या जाहिराती प्रसिद्ध करणे जेणे करून शहरात खेळाचे वातावरण निर्माण करावे. व सर्व क्रीडा शिक्षकांना क्रीडा स्पर्धा योग्य प्रकारे पार पाडाव्यात अशा सुचना बैठकीत करण्यात आल्या, सदर बैठकीस डॉ. करूणा जुईकर, अतिरिक्त आयुक्त, श्रीम. प्रियंका राजपूत, उप-आयुक्त (क्रीडा), प्रशासन अधिकारी श्री. विशाल कदम, क्रीडा अधिकारी श्री. शांताराम चौधरी, व समिती सदस्य श्री. प्रल्हाद कोलते, श्री. प्रमोद पारसी, सतिश राजगुरू, महेश बडेकर, श्रीम. दक्षता पवार, श्रीम. प्रिया मयेकर, ईश्वर सपकाळे, संजय डमाळे, संजय पाटील, पंकज पवार, सुनिल पाटील, रविद्र पाटील, श्रीम. संध्या बागुल या सर्व क्रीडा शिक्षकांनी व समिती सदस्यांनी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख यांना योग्य प्रकारे खेळांचे नियोजन करून सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात येईल असे आश्वासन दिले.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post