आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने कल्याण अंबरनाथ रोड च्या सुधारणा करण्यासाठी संन २०२३-२०२४ च्या पुरवणी मागणी मध्ये रक्कम २२ कोटी रुपये मंजूर.

 









उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 


१४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने उल्हासनगर तालुक्यातील कल्याण अंबरनाथ बदलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र ७६ वरील की मी १०९/२५००  फॉलोवर  लाईन ते किमी ११०/५२०  श्री  साईबाबा मंदिर पर्यंत रत्याची  सुधारणा करणे या कामासाठी (फोलॉवर लाईन चौक ते साईबाबा मंदिर पर्यंत)  रक्कम २२ कोटी रुपये मंजूर(तरतूद) करण्यात आलेली आहे. सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या  मांडण्यात आल्या होत्या.* या पुरवण्या मागणी मध्ये  या कामासाठी रक्कम २२ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत.लवकरच या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून  तसेच योग्य ती सर्व प्रक्रिया करून लवकरात लवकर काम सुरू करणार असून  आमदार कुमार आयलानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस जी,नामदार श्री अजित दादा पवार जी, तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रविंद्र चव्हाण नी यांचे  निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post