मनसे धडा - समृद्धी सिन्नर टोल नाका फोडला.

 









महाराष्ट्र : नीतू विश्वकर्मा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री.अमीत साहेब ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काल दिनांक २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर हुन  सिन्नर कडे समृद्धी महामार्गाहून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर सन्माननीय अमीत साहेबांचा ताफा आडवून त्यांना आर्धा तास थांबून आणि ओळख देऊन देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. टोल नाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गैरवर्तनाचा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना संताप आल्याने आज मध्यरात्री नाशिक शहराचे दबंग शहर अध्यक्ष  श्री दिलीप भाऊ दातीर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे  नाशिक शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी, मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, शहर संघटक ललित वाघ, मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे,  यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.







1 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post