उल्हासनगर शिवसेनेच्या वतीने सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर उल्हासनगरातील तमाम शिवसैनिकांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला व शिवसेना भाजप युती जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 












उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

आज सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुप्रीम सुनावणी पार पडली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला हिरवा कंदील देत सरकार पुढेही असेच चालू राहील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री राहतील यावर शिक्कामोर्तब झालेले आहे त्यामुळे सतत घटनाबाह्य सरकार म्हणून बोंब मारणाऱ्या विरोधकांना सणसणीत चपराक सुप्रीम कोर्टाने दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचा एक भाग म्हणून उल्हासनगरचे शहर प्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या नेतृत्वात कल्याण लोकसभेचे खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयात सर्व शिवसैनिकांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला व शिवसेना भाजप युती जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज),उपशहर प्रमुख नंदू भोईर, उपशहर संगठक गजानन बामणकर, विभाग प्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडे,कृष्णा सातपुते तसेच शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख युवासेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post