किणीकर विकास प्रतिष्ठान व जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने अंबरनाथ मधील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या व लग्नाची ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

 










अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा 


किणीकर विकास प्रतिष्ठान व जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने अंबरनाथ मधील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या व लग्नाची ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार समारंभ अंबरनाथ पूर्व भागातील रोटरी क्लब हॉल येथे सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. 

याकार्यक्रमा दरम्यान शंभरी पार करणारे श्री. मधुसूदन गोखले यांचा ही शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात जीवन जगत असताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे नेहमी पथ दर्शक ठरत असून या वयात ही जेष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून एक ऊर्जा मिळत असल्याने त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता व जेष्ठ नागरिक संघ, अंबरनाथ - पूर्व यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी भावना उपस्थित जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मराठी व हिंदी गाणी सादर करत आपली कला देखील सादर केली. 

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक श्री.नंदकुमार भागवत, श्री.सुभाष साळुंके, श्री.रवींद्र पाटील, श्री.संदीप तेलंगे, श्री. विजय पाटील, विभाग प्रमुख श्री.शिवाजी गायकवाड, श्री.सचिन गुडेकर, युवा सेना शहर अधिकारी श्री. राहुल सोमेश्वर, महिला आघाडीच्या सौ.सुवर्णा साळुंके, सौ. लीना सावंत, सौ. सुषमा रसाळ, जेष्ठ नागरिका संघ अध्यक्ष श्री.मोहन कुलकर्णी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक आणि मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post