महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महारष्ट्र नवनिर्माण सहकार सेना व कलकी महिला गृह उद्योग यांच्या वतीने उल्हासनगरची सखी सामाजिक महिला संस्थे चे सन्मान करण्यात आलं.

 

















उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 


बुधवार, ०३/०५/२०२३ रोजी स. १०:३० वा., रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना व कलकी महिला गृह उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने 'उत्तुंग भरारी महिला गृह उद्योगाची' हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला होता.


सखी सामाजिक महिला संस्था, महिलांसाठी करत असलेले समाज उपयोगी कार्य, महिला बचत गट तसेच महिलांन करिता रोजगार निर्मिती या कार्या करिता सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे, सौ. शर्मिला वहिनी व सौ. शालिनी ताई यांनी शाल, सन्मान चिन्ह व गिफ्ट देऊन गौरविले. संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा - सौ. सिमरन लालजीवाणी व सहकारी यांनी व्यासपीठावर जाऊन सन्मान स्वीकारला. सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे, सौ. शर्मिला वहिनी व श्री. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स) यांच्या प्रमुख उपस्थितीत  महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सौ. शालिनी ठाकरे ताई यांनी सर्व महिलांना साडी भेट दिली. कलकी महिला गृह उद्योग तसेच संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे व हितचिंतकांचे हार्दिक आभार.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post