मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळाच्या भ्रष्ट कारभारावीरोधात मनसे माथाडी सेना आक्रमक.










 








मुंबई: नीतू विश्वकर्मा


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या युनियनचे अध्यक्ष श्री अरविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व युनियनचे सरचिटणीस श्री राजनजी शितोळे यांच्या नेतृत्वाखाली लोखंड बाजार माथाडी कामगार मंडळ,कळंबोली  येथे काही पीडित कामगारांच्या प्रश्नांवर सुनावणी ठेवण्यात आलेली होती.

  गेली पाच महिने या कामगारांची मालक नोंदणी व कामगार नोंदणी  अर्जांची आवश्यक कागद पत्रांसहित मंडळाकडे पूर्तताझाल्यानंतर सुध्दा कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येत नव्हती,प्रस्थापित युनियनच्या दबावाला बळी पडून एका टोळीचा या कामाशी संबंध नसताना त्यांना काम करण्याचे आदेश मंडळाने दिले होते हे सर्रासपणे चुकीचे आणि कामगार मंडळाच्या नियमांना डावलून केलेले काम असल्याचे श्री राजनजी शितोळे यांनी मागील आठवड्यात मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळाचे  अध्यक्ष श्री आडे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले आणि तात्काळ या विषयावर नियमानुसार सुनावणी लावून आमच्या कामगारांना तात्काळ कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) सुपूर्द करण्याचे ठणकावून सांगितल्यानंतर दि.८ मार्च रोजी दुपारी सचिवांच्या दालनात या महत्वपूर्ण विषयावर सुनावणी ठेवण्यात आलेली होती.

परंतु सुनावणी दरम्यान सचिव हे वेळकाढू पणाची भूमिका घेत, असल्याचे लक्षात येताच "आमची मागणी रास्त आहे आणि मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही,आणि कामगारांवर झालेला अन्याय मनसे सहन करणार नाही,शिवाय कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) घेतल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी दालनातून उठणार नसल्याचे आणि वेळ प्रसंगी आंदोलनाला ही सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचा श्री शितोळे यांनी सचिवांना निर्वाणीचा ईशारा दिल्यानंतर सचिवांनी पाच महिन्यांपासून ताटकळत ठेवलेल्या श्री महेश प्रकाश गोडसे आणि नितीन भारत कदम या कामगारांच्या टोळी क्र. ७०१ यांना  काम करण्याचे आदेश सुपूर्द केले.

महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या प्रयत्नांनी सामान्य कामगारांना न्याय मिळालेला असल्याने कळंबोली येथील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असुन मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळ अंतर्गत नोंदीत असलेले आणि मंडळातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे अन्याय सहन करीत असलेले बहुसंख्य कामगार महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारायला तयार झालेले आहेत, हा मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आणि माझ्या सोबत नेहमीच खंबीरपणे उभे असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचा आणि कामगार एकजुटीचा विजय आहे आणि

 शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी श्री शेवाळे साहेब यांचेही आपल्याला सहकार्य लाभले असल्याचे श्री राजनजी शितोळे यांनी सांगितले.

  

यावेळी मनसे माथाडी युनियनचे संयुक्तं सरचिटणीस श्री सागर चालसे,उपाध्यक्ष श्री प्रशांत अनगुडे,उल्हासनगर शहर अध्यक्ष श्री मैनुद्दीन शेख,चिटणीस श्री संजय नार्वेकर,कल्याण उपाध्यक्ष श्री पंकज डोईफोडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे ईतर पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post