आमदार कुमार आयलानी यांच्या मागणीला यश,ठाणे - भिवंडी- कल्याण मेट्रो मार्ग क्र 5 चा विस्तार उल्हासनगर पर्यंत होणार.

 































उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

१४१ उल्हासनगर विधानसभा  आमदार कुमार आयलानी यांनी राज्य सरकार कडे ठाणे - भिवंडी - कल्याण  मेट्रो  मार्ग क्र ५ चे विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवावा अशी वारंवार  मागणी करीत  आहे.MMRDA ने आमदार कुमार आयलानी यांना  पत्र पाठवून केलेल्या मागणी नुसार सदर मेट्रो मार्ग क्र ५ चा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढविणे या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करून त्या संबंधी सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी घेऊन आवश्यक  ती कार्यवाही करण्यात  येईल असे आश्वसन दिले आहे.दिनाक १० मार्च २०२३ रोजी झालेल्या MMRDA च्या १५४ व्या बैठकीत मेट्रो मार्ग क्र ५ चा उल्हासनगर पर्यंत विस्तार वाढविण्याबाबत तातडीने कन्सल्टंट(सल्लागार)  नियुक्त करण्यास मान्यता दिली  आहे.


या बद्दल आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण,खासदार श्रीकांत शिंदे, यांचे आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post