उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर- ४ मधील दगडी शाखा येथे येत्या १० मार्चला साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची रूपरेषा आखण्यासाठी उल्हासनगर महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी आनी अंबरनाथ विधानसभा चे आमदर डॉक्टर बालाजी कीनीकर यांच्यावतीने या बैठकीला उपस्थित राहून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांशी जयंतीच्या संदर्भात चर्चा केली व नियोजित कार्यक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख श्री. अरुण आशान, अंबरनाथ आमदार श्री बालाजी कीनीकर, शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





