छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रभाग १८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महिला व बाल उद्यानाचे उद्घाटन.








उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


सर्व भगिनींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या उल्हासनगर मध्ये प्रथमच आपल्या प्रभागात क्रमांक १८ उल्हासनगर महानगरपालिका निधीतून व विविध विभागांचा सातत्यपूर्ण पाठ पुरावा करून अखेर गेल्या २५ वर्षापासून डंपिंग  ग्राउंड झ्हालेल्या उद्यानाचे ,विशेष महिलांसाठी उद्यान बनवण्यात आले हे उद्यान कुर्ला कॅम्प रिक्षा स्टॅन्ड च्या बाजूला आहे.आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून महिला व बाल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले असून आता प्रभागातील महिलांसाठी खुले करण्यात आले .

      हे उद्यान फक्त महिला व बालकांसाठी राखीव असणार आहे,तरी सर्व महिलांनी आज पासून छत्रपती शिवाजी महाराज महिला व बाल उद्यान याचा जास्तीत जास्त लाभ घेत ,रोज येथे फिरायला येवून व व्यायाम करून तंदुरुस्त रहावे ही अशी विनंती मा.नगरसेवीका अंजली साळवे यानी केली।





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post