उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझ्या वतीने उल्हासनगर- ४ येथील सुभाष टेकडी येथे “आमदार_चषक - २०२३” या क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले.
या सामन्यां प्रसंगी उपस्थित राहून फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद लुटला व जमलेल्या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सामन्यांना उल्हासनगर बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, माजी नगरसेवक सुमित सोनकांबळ, विभाग प्रमुख श्री. आदिनाथ काकडे, अंबरनाथ युवासेना शहर संघटक श्री. चंद्रकांत मोटे इतर पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.



