कल्याण येथील विजय तरुण मंडळाच्या सजावटीवर पोलिसांनी केली कारवाई

 



कल्याण:- नीतू विश्वकर्मा


विजय तरूण मंडळाच्या सजावटीवर हिटलरला पध्दतीने कारवाई करून सजावट अतिरेकी पध्दतीने जप्त केली.कल्याण येथील विजय तरुण मंडळ हे आगळा वेगळा देखावा सादर करण्यात कल्याण येथे प्रसिद्ध मंडळ आहे. तसेच शिवजयंती असो की गणेश उत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे लक्ष वेधून घेणारे असतात आणि या देखाव्याला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी सुद्धा करतात. अफजलखानाचा वध तसेच असे अनेक देखावे मंडळाने सादर केले आहेत.यावर्षी देखील मंडळांने महाराष्ट्रात जे काही सत्ता परिवर्तन झाले या  निगडित राजकीय सत्य परिस्थितीवर आधारित देखावा तयार करण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खंदे समर्थक विजय तरुण मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेना कल्याण महानगरप्रमुख विजय ऊर्फ बंड्या साळवी यांनी पोलिस उपायुक्तांनी संपुर्ण सजावट दाखवून त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून सजावट करण्यात आली होती.

विजय तरूण मंडळाचा 59वा गणेशोत्सव आहे, आम्ही श्री गणेशाच्या मूर्ती ची स्थापना व पुजा करणार नाही राज्यसरकार व पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत तीन पोलिस व्हॅन, लालदिव्यांच्या पोलिस बदोबस्त आधिकारी च्या दहा गाड्या,.CP, DCP, ACP, sr.P.I, अनेक PI व तीनशे पोलिस एवढे पोलिसबल आणुन रात्री तीन वाजता कारवाई करण्यात आली. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post