महाविकास आघाडी मधून अंबरनाथ विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने लढावी उल्हासनगर काँग्रेस कमिटीचा ठरावं.

 


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मासिक सभा काँग्रेस कार्यालय नेहरू भवन उल्हासनगर 2 येथे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.आगामी विधानसभा निवडणुकी बाबत या सभेत चर्चा करण्यात आली उल्हासनगर विधानसभा व उल्हासनगरचा काही भाग कल्याण पुर्व मध्ये तथा उल्हासनगर 4 व 5 मिळून अंबरनाथ विधानसभा आहे ठरावं क्रमांक 01 अंबरनाथ 140 विधानसभा ( अ जा ) महाविकास आघाडी मधून काँग्रेस पक्षाने लढावी,ठरावं क्रमांक 02 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 140 अंबरनाथ विधानसभा (अ जा) रोहित चंद्रकांत साळवे यांना उमेदवारी देण्यात यावी. असे ठरावं उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दीपक सोनोने यांनी मांडला  त्याला अनुमोदन उल्हासनगर काँग्रेस नागरी सेल अध्यक्ष वामदेव भोयर यांनी दिले सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या सभेला साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके. नार्थ ब्लॉग अध्यक्ष नानिक आहुजा. सेंट्रल ब्लॉग अध्यक्ष सुनिल बहरानी. प्रदेश प्रतिनिधी वजरुद्दीन खान. महिला अध्यक्ष मनिषा महाकांळे. विद्यार्थी अध्यक्ष रोहित ओव्हाळ,शाम मढवी,आसाराम टाक, नारायण गेमनानी,सिंधूताई रामटेके,निलेश जाधव, सामवेल मावची, ईश्वर जग्यासी‌, मनोहर मनुजा,रजनीकांत शहा,राकेश मिश्रा,तारकेश्वर राय.आबा साठे,आनंद साळवे,संध्या महाकांळे,सुधा जोगळेकर,  सुशमा जोगळेकर,आदी उपस्थित होते.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post